Like & Share This page

Friday, 27 May 2016

गल्लीबोळात मिर्ची विकून बारावीला मिळवले 92%



नागपूरमध्ये गल्ली-बोळात फिरत मिर्ची विकणाऱ्याची मुलगी निकिता गोंडाणे या विद्यार्थिनीने 12वी परीक्षेत 92 टक्के गुण मिळविले आहे.

विपरीत परिस्थिती कधी ही मेहनत, जिद्द, चिकाटी ला पराभूत करू शकत नाही. हेच नागपुरच्या गिट्टीखदान परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या निकिता गोंडाणे या विद्यार्थिनी ने सिद्ध करून दाखविले आहे. दलित कुटुंबातील निकिताच्या घरची परिस्थिती बेताचीच. वडील पुरुषोत्तम गल्लोगल्ली सायकलने फिरून मिर्ची विकतात. तर आई पमिता घरीच शिवणकाम करते.

यावर्षी तर निकिताच्या शाळेची फी भरायला ही कुटुंबाकडे पैसे नव्हते. मात्र, जाईबाई चौधरी ज्ञानपीठ शाळेने थकित फीला महत्त्व न देता निकिताच्या गुणवत्तेला महत्त्व दिले. तर दिवसभर 30-40 किमी. फिरून वडील पुरुषोत्तम यांनी फक्त कुटुंबाचे पोटच भरले नाही तर त्यांच्या दोन्ही मुलींना खुप शिकण्यासाठी प्रेरित ही केले. निकिताने ही पालकांच्या इच्छेप्रमाणे खूप मेहनत केली.

2 खोल्यांच्या आपल्या घरात कधी अंगणात तर कधी स्वंयपाक घरात बसून रात्र न दिवस अभ्यास केला 91.53 टक्के गुण मिळविले.निकिताला सीए व्हायचं आहे. 12वी मध्ये 92 टक्के गुण मिळाल्याने तिचा उत्साह दुणावला आहे. शिवाय विपरीत परिस्थितिशी लढण्यासाठी तिच्या जवळ जिद्द, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्ति आहेच.

No comments:

Post a Comment