Like & Share This page

Saturday, 16 July 2016

तुझ्या वाचुन करमेना....


तुझ्या वाचुन करमेना
 
मला बाकी काही नको,
फक्त एकदा मला मिठीत घेऊन जा...!
मला सोडुन जात आहेस,
तुझ्यासाठी माझ्या आठवणी घेऊन जा...!!

तुझा कोमल हात,
माझ्या ह्र्दयावर ठेवुन...!
हे मनातले वादळ,
तेवढं शांत करुन जा...!!

अंधारात जगणे,
शिकता येईल मला...!
या पेटलेल्या भावनांना,
तेवढं विझवुन जा...!!

श्वासांचा स्पर्श होऊ दे,
अशी थोडी जवळ ये...!
तुझ्यातल्या सुगंधाला,
माझ्या श्वासात ठेवुन जा...!!

आयुष्यभरासाठी,
अश्रु देऊन...!
तुझ्यासाठी माझं सगळं,
सुख घेऊन जा...!!

एकदा माझे डोके,
तुझ्या मांडीवर घे...!
तुझ्याच हाताने माझे,
तेवढे डोळे बंद करून जा...!!

तु माझी नाहीस,
मी हे समजुन जग सोडुन जातो...!
मला इतर कुठेही मरण नको,
फक्त एकदा मला मिठीत घेऊन जा...!

fb.com/funnyfinternet

No comments:

Post a Comment