Like & Share This page

Friday 27 May 2016

गल्लीबोळात मिर्ची विकून बारावीला मिळवले 92%



नागपूरमध्ये गल्ली-बोळात फिरत मिर्ची विकणाऱ्याची मुलगी निकिता गोंडाणे या विद्यार्थिनीने 12वी परीक्षेत 92 टक्के गुण मिळविले आहे.

विपरीत परिस्थिती कधी ही मेहनत, जिद्द, चिकाटी ला पराभूत करू शकत नाही. हेच नागपुरच्या गिट्टीखदान परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या निकिता गोंडाणे या विद्यार्थिनी ने सिद्ध करून दाखविले आहे. दलित कुटुंबातील निकिताच्या घरची परिस्थिती बेताचीच. वडील पुरुषोत्तम गल्लोगल्ली सायकलने फिरून मिर्ची विकतात. तर आई पमिता घरीच शिवणकाम करते.

यावर्षी तर निकिताच्या शाळेची फी भरायला ही कुटुंबाकडे पैसे नव्हते. मात्र, जाईबाई चौधरी ज्ञानपीठ शाळेने थकित फीला महत्त्व न देता निकिताच्या गुणवत्तेला महत्त्व दिले. तर दिवसभर 30-40 किमी. फिरून वडील पुरुषोत्तम यांनी फक्त कुटुंबाचे पोटच भरले नाही तर त्यांच्या दोन्ही मुलींना खुप शिकण्यासाठी प्रेरित ही केले. निकिताने ही पालकांच्या इच्छेप्रमाणे खूप मेहनत केली.

2 खोल्यांच्या आपल्या घरात कधी अंगणात तर कधी स्वंयपाक घरात बसून रात्र न दिवस अभ्यास केला 91.53 टक्के गुण मिळविले.निकिताला सीए व्हायचं आहे. 12वी मध्ये 92 टक्के गुण मिळाल्याने तिचा उत्साह दुणावला आहे. शिवाय विपरीत परिस्थितिशी लढण्यासाठी तिच्या जवळ जिद्द, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्ति आहेच.

Saturday 14 May 2016

संभाजी राजे एक दृष्टिक्षेप

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा


          १४ मे १६५७ सईबाईंच्या पोटी पुरंदरावर एका शुराचा जन्म झाला. आपल्या थोरल्या मुलाची आठवण म्हणून जिजाऊंनी या तेजस्वी पुत्राचे नाव ठेवले 'संभाजी'. युगपुरुष शिवाजी राजांसारखा कर्तृत्ववान पिता लाभल्याने. राजकारणातील डावपेच, रणांगणावरील मोहिमा याचे बाळकडू लहाणपणा पासूनचं मिळाले. नकळत्या वयातच संभाजीराजे मातृसुखास पारखे झाले, सईबाई राणीसाहेबांचे निधन झाले. अशाच वेळी स्वराज्य निर्माता घडविणाऱ्या जिजाऊंनी स्वराज्याचा वारस घडविण्याची जवाबदारी उचलली आणि ति लीलया पार देखील पाडली. संभाजीराजांना पुण्याजवळील कापूरहोळ गावातील धाराऊ नावाची स्त्री दुधाई म्हणून मिळाली.

वयाच्या १४व्या वर्षापासून मुलुखगिरीत शिवरायांचे दिस गेले, परंतु संभाजी राजांच्या शिक्षणासाठी शिवरायांनी विशेष लक्ष दिले. वेगवेगळ्या भाषेचे जाणकार संभाजी राज्यांनी शिकवण्यासाठी ठेवले गेले, आणि यातून शंभूराजे घडत गेले. १४ भाषांचे ज्ञान संभाजीराजांच्या ठायी आले, संभाजी राजे स्वतः श्लोक लिहू लागले संस्कृत भाषेवर प्रभुत्व गाजवू लागले, विविध कला विविध क्षेत्रांत ते पारंगत जाहले. वाढत्या वयाच्या तिप्पट वेगाने, मनाने आणि मेंदूने शंभूराजे वाढत होते... ज्या वयात मुलं खेळ, आणि बाजारगप्पा मध्ये रमतात... त्या वयात शंभू राजांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहून सगळ्यांना अवाक करून सोडले होते... नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक या ग्रंथांची सुद्धा त्यांनी निर्मिती केली. शिक्षण क्षेत्रात घडत असतानाच शंभूराजे भालाफेक, मल्लविद्या, तलवारबाजी, घोडेबाजीत तरबेज झाले.

१६६५ साली झालेल्या पुरंदरच्या तहात शिवरायांचा नाईलाज झाला आणि मोघलांना २३ किल्ले द्यावे लागले, या तहाची पूर्तता होईपर्यंत ८ वर्षाच्या संभाजीराजांना मोगलांकडे ओलीस राहावे लागले आणि आशा तऱ्हेने शंभूराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. पुढे त्यांना आग्र्यास औरंगजेबाच्या भेटीस जावं लागलं याचं अनुषंगाने मोघली रियासतीचा दरबाराचा नी राजकारणाचा जवळून अभ्यास झाला. पुढे आग्र्याहून सुटकेच्या वेळी संभाजीराजांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्यांच्या घरी मथुरेस ठेवले गेले. पुढे ते स्वराज्यात सुखरूप येऊन पोचले देखील. वयाच्या

इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले. यावेळी संभाजी राजांचे वयवर्षे होते १७. ऐन तारुण्यातचं शिवरायांच्या मंत्रीमंडळातील मंडळीसोबत संभाजींचे खटके उडाले त्यामुळे अनेक अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले आणि हा संघर्ष विकोपास गेला शिवराय असे पर्यंत हा संघर्ष जास्त घडला नाही पण शिवरायांच्या मृत्यूपश्चात संभाजीला कैद करण्यापर्यंत या मंत्रीमंडळाची मजल जाऊन पोचली. शेवटी मंत्र्यांचा समाचार घेत. शंभूराजांनी सत्तेचे सर्वसूत्रे आपल्या हाती घेतली.

१६ जानेवारी १६८१ साली संभाजी राजांचा राज्याभिषेक जाहला आणि एकाच वेळी पाच पाच शाह्या मोडून काढण्यासाठी ते जोमाने उभे राहिले....
त्या दरम्यान त्यांच्या आयुष्यात, बुऱ्हाणपूर वरील छापा, मुरुडजंजिरा, आरमार उभारणी, यासारखी अनेक आव्हाने आणि घटना घडून गेल्या. केवळ ९ वर्षाच्या कारकिर्दीत, स्वराज्यातील एकही किल्ला वैऱ्यांच्या ओटीत त्यांनी पडू दिला नाही. शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली; पण महासंकटांच्या दर्यातही आपल्या पित्याचे एकही जहाज बुडू दिले नाही. ९ वर्षाच्या राजवटीत आपल्या तेजस्वी पराक्रमाने अवघा हिंदुस्तान उजळून टाकला होता ह्या रणमर्दाने… २० लाखांची फौज असेलेल्या ५-५ शत्रूंना अंगावर घेऊन नेस्तनाबूत केले होते ह्या रणसर्जाने … 42 दिवस अनंत अत्याचाराला सामोरे साक्षात मरणाला देखील शरण येण्यास भाग पडले होते ह्या मृत्युंजयाने ….

आलम हिंदोस्ताँ का पातशहा जिसके सामने कायर था
इतिहास भी दे गवाही उसकी के एक राजा शायर था.....
 धर्मविर छञपती संभाजी महाराज


* १४ मे १६५७ रोजी पुरंदरावर जन्माला आलेला युगंधर म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या दुसर्या वर्षी आईविना पोरका झालेला बाळ म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या नवव्या वर्षी ४ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या दहाव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुञ म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या अकराव्या वर्षी ५ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या तेराव्या वर्षी रायप्पा महाराचा भर दरबारात सत्कार करणारा म्हणजे शंभुराजा.
*वयाच्या चौदाव्या वर्षी महान बुधभुषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृतपंडीत म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या पंधराव्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील तीन महान ग्रंथ लिहिणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या सोळाव्या वर्षी १० हजार सैनिकांचे नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभुराजा.
*वयाच्या सतराव्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य करणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या अठराव्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या एकोणिसाव्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देहू ते पंढरपूर ही पहिली वारी सुरू करणारा म्हणजे शंभुराजा.
*वयाच्या तेविसाव्या वर्षी शिवरायांच्या गादीवर बसणारा दुसरा छञपती म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या तेविसाव्या वर्षापासुन बत्तीसाव्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तूगीज, फ्रेँच, डग आणि मोगल या पाच सत्ताधार्यांशी लढणारा म्हणजे शंभुराजा.
आणि
* वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छञपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी,आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान करणारा शुरवीर योद्धा म्हणजे आमचा शंभुराजा****छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा !