हिंदू-मुस्लिम माणुसकीचे दर्शन
नक्की वाचा - हे फक्त आपल्या भारतातच होऊ शकते
मुंबई च्या मालाड या मुस्लिमबहूल भागात 1 हिंदू विधवा महिला सखू किरणसिन्ह अनेक वर्षापासून एकटीच राहत होती. शुक्रवारी राहत्या घरी तिचे निधन झाले.आजूबाजूला मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने राहतात,तिच्या कुटुंबात कोणीच नव्हते.
जेंव्हा त्या परिसरातील मुस्लिम तरुणांना या घटनेची माहिती झाली तेंव्हा त्या मोहल्ल्यातील सर्वांनी मिळून हिंदू धर्माच्या परंपरेनुसार अंत्यविधीसाठी लागणार्या सर्व साहित्याचा बंदोबस्त केला. त्याच परिसरातील मुस्लिम तरुणांनी त्या हिंदू स्त्रीला खांदा देत सामाजिक एकतेचे आणि माणुसकीचे अनोखे दर्शन देऊन एक चांगला संदेश सर्व समाजाला दिला. सर्व लोकांनी साश्रूनयनांनी ओशिवरा येथील स्मशान भूमीमध्ये त्या महिलेचे अंत्यसंस्कार केले
माणुसकीचे दर्शन घडवणार्या या गोष्टीसाठी एक जय हिंद झालाच पाहिजे

No comments:
Post a Comment