
!!! खरच वाचा !!!
हि घटना आहे हैद्राबाद मधील अमिरपेठ शहरातील ज्या शहराच्या नावातच श्रीमंती आहे तीथली ही घटना एकदा खरच वाचा..
काल रात्री जेवल्यानंतर सहज फिरुन यायच म्हणून आम्ही ३ मित्र बाहेर पडलो. थोड्या अंतरावर आल्यावर बघतो तर काय एक लहान मुलगा कदाचीत ५ ते ६ वयाचा असेल आधीच रात्र अन त्यात थोडा पाऊस पडल्यामुळे थंडी पण होती त्या परीस्थितीत हा मुलगा अंगाला सिल्व्हर कलर माखुन एक लहान मग घेउन बसला होता भिक मागण्यासाठी त्यावेळी त्याच्या अंगाला कलर माखण्या मागे एकच कारण होत ते म्हणजे रात्रीच्या वेळी तो सगळ्याना दिसावा व आकर्षिक होऊन येणार्या जाणाऱ्या लोकांनी त्याला पैसे द्यावे..हे सगळ चालु असताना त्याला एका मानसाने आंब्याचा जुस आनुन दिला पण तो मुलगा तो जुस नाकारत होता पण त्या मानसाने त्याच्याजवळ ठेवला अन निघुन गेला...थोड्या वेळाने त्या मुलग्या जवळ एक कुत्र्याच लहान पिलु आल अन त्याला ठेवलेल्या जुस कडे बघु लागल न प्रयत्न करु लागल जुस घेण्याचा त्यावेळी त्या लहान मुलग्याने चावेल म्हणून हात वर केला अन ते कुत्र त्याच्या मागे जाऊन बसल कारण हा मुलगा जुस पिउन झाल्यावर त्या ग्लास मधील राहीलेला आपल्या मिळु शकेल पण थोड्या वेळाने बगतो तर काय तोंड न लावलेला तो जुस चा ग्लास आहे तसा त्या कुत्र्याच्या पिलाला जाऊन दिला खरच डोळे भरुन येतात असे काही पाहीले की....यालाच म्हणतात प्रेम व मानुसकी

No comments:
Post a Comment