Like & Share This page

Sunday 26 June 2016

26 जुन 1874 रोजी जन्मलेले एक महानायक श्री राजर्षी शाहू महाराज (यशवंतराव जयसिंगराव घाटगे)

26 जुन 1874 रोजी जन्मलेले एक महानायक 

श्री राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर,


जातीभेदाविरुद्ध लढा:

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

इतर कार्ये:

शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.

कलेला आश्रयः

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

स्वातंत्रलढ्यातील योगदान :

महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.

पारंपारिक जातीभेदाला विरोधः

शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करुन महाराजाना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रुंचे सारे प्रयत्न विफल ठरले.

कार्य दृष्टीक्षेप :

Birth Date - 26 June 1874
Birth Place - Kagal (Kolhapur)
Name - Yashwantrao Jaisingrav Ghatge (यशवंतराव जयसिंगराव घाटगे)
Death - 6 May 1922 (Mumbai)
* कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.
* 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
* 1891- श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब यांच्याशी विवाह झाला
महाराजांचे शिक्षण - *1985 ते 1894 या काळात शैक्षणिक कार्य पूर्ण केले
*1894 सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे शिक्षण घेतले
*1898 पर्यंत राजकोट येथे Principal McNoton यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.
* 2 एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक समारंभ झाला.
*1894 - राजे झालेनंतर लगेचंच त्यांनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला
व वेठबिगाराची पद्धत बंद केली.
* 1895 साली मोतीबाग तालीम सुरु केली. शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे. याच वर्षी शाहूपुरी गुळाची व्यापार पेठ सुरु केली.
* 27 मार्च 1895 - पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले.
* 1887 - आळते महार स्कूल ची स्थापना केली, दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.
* 1899 - वेदोक्त प्रकरण याच वर्षी घडले. तेंव्हापासून ब्राम्हणांच्या मक्तेदारीस शह देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बहुजनांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बहुजन उद्धाराचे कार्य हाती घेतले. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणांचे समर्थन केले.
* 1901 साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या बोर्डिंग ची स्थापना कोल्हापुरात केली. याच वर्षी
नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. तसेच गोवध बंदी कायदा केला.
* 20 जुलै 1902 रोजी संस्थानामध्ये नोकरी मध्ये 50% आरक्षण देण्याचा आदेश काढला.
* 9 नोव्हेंबर 1906 रोजी 'किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तसेच शाहू मिल तथा 'शाहू स्पिनिंग अंण्ड विव्हिंग मिल' ची सुरुवात केली.
* 1907 सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरु केली. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी ' मिस क्लार्क बोर्डिंग हाउस ची' स्थापना केली.
* 1908 बॉंबस्फोट घडवून महाराजांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न समाजकंटकांकडून केला गेला.
* 1910 जहागीरदारांचे अधिकार कमी केले
* 11 जानेवारी 1911 साली
कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून परशुराम घोसटवाडकर तर प्रमुख म्हणून भास्करराव जाधव हे काम पाहत. याच वर्षी विद्यार्थ्यांना 15% नादारी देण्याची घोषणा केली.
-शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.
-कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले.
-सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुणे येथे भरवले
* 1912 - खासबाग मैदान या कुस्ती मैदानाची सुरुवात कोल्हापूर येथे केली. (याला 2012 साली 100 वर्षे पूर्ण झाली).
- सहकारी कायदा केला व सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले.
-सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक येथे भरवले
*1913 गाव तिथे शाळा असावी असा अध्यादेश काढला. पाटील शाळांची सुरुवात केली.
-कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरु केली.
* 1916 साली संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले
-बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी 'डेक्कन रयत शिक्षण संस्थे' ची स्थापना निपाणी या ठिकाणी केली.
-आर्य समाजाची तत्त्वे याच वर्षी स्वीकारली.
* 1917 विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली
- 25- जुलै पासून संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
* 1918 आंतरजातीय विवाहास कायद्याने मान्यता दिली
- कुलकर्णी व महार वतने रद्द केली.
- जमिनी रयतवारीने कसण्यास दिल्या
- आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात सुरु करून राजाराम कॉलेज या संस्थेकडे चालवण्यास दिले.
- गुन्हे गारी जमातीच्या लोकांची पोलीस हजेरी बंद केली.
- तलाठी शाळा सुरु केल्या.
* 1919 - स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध कठोर कायदा केला.
- एप्रिल 1919 - कानपूर - "अखिल भारत वर्षीय कुर्मी क्षत्रिय महासभा" या संस्थेच्या 13 व्या
अधिवेशनात त्यांच्या अतुल्य कार्याबद्दल "राजर्षी" पदवी बहाल करण्यात आली.
- शाळेत अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारा कायदा केला.
* 1920 - घटस्फोटाचा कायदा करण्यात आला
- देवदाशी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली
- हुबळी - "ब्राम्हणेतर सामाजिक परिषद" चे अध्यक्षपद भूषवले
- पूजाअर्चा शिकाऊ उमेदवाराकडून करावी असा आदेश काढला
* 6 मे 1922 रोजी मुंबई येथे निधन.

No comments:

Post a Comment