Like & Share This page

Thursday 26 January 2017

२६ जानेवारी म्हणजे काय ?

२६ जानेवारी म्हणजे काय ?
==================
२६ जानेवारी पासून भारतात संविधान लागू करण्यात आले. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्षे ११ महिने १७ दिवस सतत सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची लिहले. संविधान लिहितांना डॉ. बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी केली नाही.
डॉ. बाबासाहेबांनी जगातील सर्व प्रगत राष्ट्रांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची राज्यघटना बनविली. त्या घटनेप्रमाणे २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रयींवर आधारलेले लोकशाही राज्य म्हणून भारत हे राष्ट्र जगाच्या पाठीवर उभे राहिले.

सर्व देशातील लोकांचा समान दर्जा असला पाहिजे आणि स्वतः ची सर्वांगीण प्रगती घडवून आणण्यासाठी त्यांना समान संधी मिळाली पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी कलमे तयार केली. अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा व्हावा, म्हणून घटनेत एक कलम घालणे त्यांनी सभासदांना पटवून दिले. मागासलेल्या वर्गांना, विशेषतः अस्पृश्य व वन्य जाती यांना व स्रियांना घटनात्मक हक्क मिळणे हे जरूरी आहे आणि त्याबद्दलची देखील कलमे त्यांनी लिहून काढली. हजारो वर्षे दलित जातींचे शेकडो जीवनमरणांचे प्रश्न जे होते त्यांना देशाच्या राज्यघटनेत स्थान मिळवून देण्याचे अजरामर कार्य बाबासाहेबांनी केले.

भारताची राज्यघटना इतर देशातील राज्यघटनेपेक्षा आकाराने मोठी असूनही फार कमी काळात ती तयार करण्यात आली आहे.
१) अमेरिकेच्या घटनेला( ४ ) महिने लागले .
२) कॅनडा च्या घटनेला( २ ) वर्षे ५ महिने लागले .
३ ) ओस्ट्रेलियेच्याघटनेला (९ )वर्षे लागले .
४ ) दक्षिण आफ्रिकेच्या घटनेला (१ )वर्ष लागले.

भारताची राज्यघटना २ वर्षे ११ महिने १७ दिवसात लिहिल्या गेली. तिच्यामध्ये ३९५ कलमे, ७ परिशिष्टे आहेत त्याचप्रमाणे घटनेच्या कामकाजासाठी ११ सत्रे झाली. १४१ बैठका झाल्या. ७६३५ दुरुस्त्या सुचविल्या. त्यापैकी २४७६ मंजूर केल्या गेल्या. ११४ दिवस घटनेवर चर्चा चालली.१६५ दिवस कामकाज चालले. त्यासाठी ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपये इतका खर्च झाला. घटनेचे प्रथम प्रकाशन १९५२ साली झाले. तिच्या १००० प्रती छापण्यात आल्या होत्या. मुळ प्रती इंग्रजीत आहेत इतर १४ भाषेत त्यांचे भाषांतर केले आहे. त्यावर ४४२ सदस्यांच्या सह्या असून ३१ व्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भीमराव आंबेडकर अशी मराठी सही आहे.

२६ जानेवारी १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिला. आणि मताच्या आधारेच "प्रजेची सत्ता निर्माण केली." स्वतंत्र पूर्वी भारतात "राजा" हा राणीच्या पोटातून जन्म घेत असे. परंतु प्रजासत्ताक दिनापासून गणराज्य हे मताच्या पेटीतून जन्म घेते...
एवढे मोठे परिवर्तन भारतरत्न, विश्वविभूषण, भारतीय संविधानाचे शिल्पकार, समस्त भारताचे उद्धारक थोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणले.

२६ जानेवारी संविधान दिन चिरायू होवो.

No comments:

Post a Comment